94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड
![94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/24jayant-naralikar.jpg)
पुणे |महाईन्यूज|
नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी वैज्ञानिक जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू होती. मात्र अखेरीस जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या 4 तास चालल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर एकमत झालं आहे. नारळीकर यांच्यासारख्या एका ज्येष्ठ वैज्ञानिक साहित्यिकाची अध्यक्षपदासाठी निवड झाल्याने यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाबाबतचं औत्सुक्य वाढलेलं आहे
कोण आहेत जयंत नारळीकर?
जन्मगाव – कोल्हापूर
जन्म – 19 जुलै 1938
– खगोल भौतिक शास्त्रज्ज्ञ व सुप्रसिद्ध लेखक
– केम्ब्रिज विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्था हे त्यांच्या कार्यसंस्था
नारळीकर यांची गाजलेली पुस्तके –
1) अंतराळातील भस्मासूर
2) अंतराळ आणि विज्ञान
3) गणितातील गमती जमती
4) यशाची देणगी
5) चार नगरातील माझे विश्व
जयंत नारळीकर यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार –
1) 1965 पद्मभूषण
2) 2004 पद्मविभूषण
3) 2010 महाराष्ट्र भूषण
4) अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कार