जलसंवर्धनासाठी झटणाऱ्या ५ जल ‘दुर्गां’ सन्मानित!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Jaldurga-780x461.jpg)
पुणे । महाईन्यूज ।
पाणी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात योगदान देणाऱ्या उमा असलेकर(पुणे),डॉ. संध्या दुधगावकर, (परभणी),डॉ. धनश्री पाटील,( कोल्हापूर), डॉ. स्वप्नजा मोहिते (रत्नागिरी), शालू कोल्हे, (गोंदिया) या ‘जल ‘ दुर्गांचा सन्मान रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ची जल संवर्धन समिती ,रोटरी क्लब च्या नऊ महिला अध्यक्ष आणि संस्कार भारतीतर्फे नवरात्री निमित्त करण्यात आला. ‘पर्याय ‘ या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक सीमंतिनी खोत यांच्या हस्ते १ ऑक्टोंबर २०२२ रोजी कर्वे शिक्षण संस्था, ( कर्वेनगर ) येथे संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लब ऑफ पूना,रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट, रोटरी क्लब ऑफ पूना मिड टाऊन,रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर,रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर,रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाईड,रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज,रोटरी क्लब ऑफ निगडी -आकुर्डी या क्लबच्या महिला अध्यक्षांनी संयुक्तपणे केले.यावेळी मंजू फडके ( नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१), मैथिली मनकवाड( अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पूना ), सतीश खाडे(अध्यक्ष,रोटरी वॉटर कमिटी), भाग्यश्री भिडे( अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट ), स्वाती मुळे ( अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पूना हेरिटेज ), कल्याणी कुलकर्णी ( अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ आकुर्डी ), मृणाल नेर्लेकर ( अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर ), प्रणिता आलूरकर ( अध्यक्ष ,रोटरी क्लब ऑफ निगडी ), मीना राव ( अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड ),माधुरी कुलकर्णी (अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पुणे मिड टाऊन) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मृणाल नेर्लेकर यांनी आणि स्वाती मुळे यांनी स्वागत केले तर रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर च्या अध्यक्षा मधुरा विप्र यांनी आभार मानले.
प्रत्येकाने व्हावे जलरक्षक :सीमंतिनी खोत
यावेळी बोलताना सिमंतिनी खोत म्हणाल्या,’ आपल्याला ज्या प्रकारे आजवर पाणी उपलब्ध होऊ शकले, तसे ते पुढच्या पिढ्यांनाही पोहोचविण्यासाठी आपण सतत कार्यरत राहायला हवे, पाण्याचा पुनर्वापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा साध्या उपायांनी सुध्दा आपण प्रत्येक जण जल रक्षक होऊ शकतो.शेतकरी हा आपल्या देशातील खऱ्या अर्थाने जलरक्षक आणि जल संवर्धक कार्यकर्ता आहे, असे मला वाटते. बहुतेक प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने निदान आपल्या शेतापुरते का होईना पण पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करत असल्यामुळे, अन्नधान्याचा प्रश्न किमानपक्षी सुटत आहे, त्यामुळे शेतकरी हे खरे जल संवर्धक व जल रक्षक आहेत’.
कशासाठी ? पाण्यासाठी ! : पाण्यासाठी प्रयत्नरत ‘जल ‘ दुर्गांचा सन्मान*
पाणी व पर्यावरण विषय लोकांचा प्राधान्य विषय बनवणे. त्यासाठी त्या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे काम समाजापुढे आणणे. इथे विशेषतः महिलांचे काम लक्षात घेउन त्यांच्या कामाची दखल घेणे, समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणे व इतरांना त्यांच्या कामामुळे दिशा व प्रेरणा मिळणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे संयोजकांच्या वतीने मैथिली मनकवाड, सतीश खाडे यांनी सांगीतले.