ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

संत निरंकारी मिशनद्वारा रुपीनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ४०७ जणांनी नोंदविला सहभाग

पिंपरी : सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील रुपीनगर शाखेच्या तर्फे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ३ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ४०७ जणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. वाय.सी.एम.रक्तपेढी आणि संत निरंकारी रक्तपेढीच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ४०७ युनिट रक्त संकलन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन श्री ताराचंद करमचंदानी जी (पुणे झोन प्रमुख) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला आमदार श्री आण्णा बनसोडे यांनी भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते. ज्याचे उद्घाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते. आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू आहे. त्यात आतापर्यंत बारा लाखाहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि, ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात. ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून मिशनच्या स्वयंसेवकांनी रूपीनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भास्कर म्हस्केजी यांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्याचे, मान्यवरांचे आभार रुपीनगर शाखा प्रमुख प्रल्हाद गोगरकरजी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button