38 लाख 52 हजार खातेधारकांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/money-2000.jpg)
मुंबई – राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर हलका करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेत आतापर्यंत 38 लाख 52 हजार खातेधारकांच्या बॅंक खात्यात 14 हजार 983 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर केली होती.
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. तसेच 2001 ते 2016 या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेत आतापर्यंत 38 लाख 52 हजार खातेधारकांच्या बॅंक खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यात आली आहे.