TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

तळेगाव येथील किशोर आवारेंच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या २ जणांना अटक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांनी दोघांना चार पिस्तूल सह अटक केली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आरोपी हे तळेगाव येथील किशोर आवारे यांच्या खूनाचा बदल्याच्या तयारीत होते.

प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (वय 30, रा. धनगर बाबा मंदिराच्या मागे काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, इतर तिघेजण अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली की संशयीत काही जण कारमध्ये तळेगाव दाभाडे एसटी स्टँड परिसरात फिरत होते. याबाबत गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी याला अटक केली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यांना चार पिस्तुल आणि काडतुसे मिळून आली आहेत. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आरोपी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले.
त्यामुळे आरोपी आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्लॅन करीत असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्लॅनमध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली. मात्र या साऱ्या प्रकारानंतर तळेगाव परिसरात पुन्हा खळबळ पसरली असून आरोपी नेमके कोणाचा खून करून बदला घेणार होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलीस आयुक्तालयात येऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. आता साऱ्या परिस्थितीला पिंपरी-चिंचवड पोलीस कसे सामोरे जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button