मुंबईत 1,431, पुण्यात 3,088 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 55,79,897 वर
![There is no significant increase in coronary heart disease in Maharashtra - Health Department reveals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-4.jpg)
मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 26,672 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 594 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 29,177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 55,79,897 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 88,620 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 51,40,272 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 3,48,395 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील महिन्यात सलग पाच हजारांहून अधिक विक्रमी दैनंदिन रुग्णवाढ होत होती. मात्र २६ एप्रिलपासून दररोज ५ हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. काल दिवसभरात मुंबईत 1,431 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 1,470 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 6,97,810 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 14,623 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 6,52,686 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 28,410 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच पुणे जिल्ह्यात रविवारी 3,088 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 9,95,524 वर पोहोचली असून काल दिवसभरात 94 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 16,089 इतका झाला आहे. तसेच पुण्यात काल 7,978 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9,33,099 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 709, पिंपरी-चिंचवडमधील 655 आणि ग्रामीण भागातील 1,472, इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.