Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बेस्ट ऑफ लक! दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू

महाराष्ट्रातून १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार परीक्षेला

पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात उद्या २१ फेब्रुवारी २०२५ पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. तर परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १९ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तर ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा  : छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद गोसावी म्हणाले, उद्या होणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यातील ७०१ केंद्रांतील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे १३९, नाशिक ९३, नागपूर ८६, मुंबई १८, कोल्हापूर ५४, लातूर ५९ या विभागाचा समावेश करण्यात आला आहे. तर राज्यातील परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button