दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच, शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती
![Varsha Gaikwad on the committee for the Uttar Pradesh Assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/varsha-gaikvad.jpg)
मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही यावर सांशकता आहे. मात्र दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच ही परीक्षा ऑफ लाईन होणार आहे.
“आम्ही खूप साऱ्या तज्ञांशी यासंबंधी बोलत आहोत. सध्या तरी परीक्षेची जी तारीख दिली आहे त्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आणि ऑफलाइन पद्धतीने होणार कारण ही बोर्डाची परीक्षा आहे. आम्ही ऑगस्टमध्ये अभ्यासक्रम कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरपासून पेपर पॅटर्न, त्याची तपासणी कशी करायची हे ठरतं. आम्हाला गाव खेड्यापर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी किमान दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना प्रक्रियेसाठी बोर्डाने किमान दीड ते दोन महिने लागतात. मागील वर्षात मुलांचं जे नुकसान झालं आहे त्याचा विचार करावा लागेल,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.