३१ जुलैनंतर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
![Lockdown again in Maharashtra ?; Chief Minister Uddhav Thackeray made it clear](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images_1585328096412_uddhav_thackeray.jpg)
मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेतां लॉकडाऊन जारी केला होता. देशातही ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, त्यानंतर १ ऑगस्टला काय होणारं असा प्रश्न सगळ्यांना पडला असेलच. याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल (२३ जुलै) पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील असे सांगितलं.“मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही आहे. मी याला अनलॉकडाउन असं म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. आपण सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे,” असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.