breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

होळकरांच्या संपत्तीवर पवारांचा डोळा, अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांचा आरोप

सांगली – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. होळकरांच्या सातबाऱ्यावर पवारांचा डोळा असल्याचे त्यांनी म्हंटलंय.
भूषणसिंह म्हणाले, आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. संभाजीराजे छत्रपती जर उद्याच्या जेजुरीमधील कार्यक्रमाला जाणारच असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण झले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण सुरू असून आज पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे यांनी जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे भूषण सिंह होळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितला आहे. तसेच या पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या हस्ते होऊ नये, या गोष्टीला आमचा विरोध असून छत्रपती संभाजी महाराज जर त्या कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे योग्य ठरेल, त्याला आमचा विरोध असणार नाही, पण होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि 70 वर्षांपासून बहुजन समाजाचा राजकारणासाठी वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास देशभरातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button