breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉटेलमध्ये या, कितीही खा, बिल नाही, स्वेच्छेने द्या

सोलापुरातील निस्वार्थी सेवा देणारं हॉटेल, अक्कलकोट तालुक्यातील शावळ

सोलापूर |महाईन्यूज|

आता हॉटेल म्हटलं तर साहजिकच बिल आलंच. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता, जेवण केलं की, खुर्चीवरून उठण्याअगोदरच तुमच्या समोर बिल ठेवलं जातं. मात्र, याला सोलापुरातील एक हॉटेल अपवाद ठरत आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला कशाही प्रकारचं बिल दिलं जात नाही, तुम्ही स्वइच्छेने जे द्याल ते स्वीकारलं जातं. इतकंच नाही तर तुम्ही पैसे दिले नाहीत, तरीही चालतं.

सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे एक असं हॉटेल आहे जिथे तुम्हाला बिल दिलं जात नाही. शिवपाद किणगे उर्फ महाराज यांच्या उदारमतवादी धोरणामुळे यांच्या हॉटेलमध्ये तुम्ही किती खाल, काय नाश्ता कराल याचा हिशेब नसतो. ना तुम्हाला बिल दिलं जात, ना पैसे मागितले जात. इथे येऊन मनसोक्त नाश्ता करायचा आणि किती बिल द्यायचे हे खाणाऱ्यानेच ठरवायचं. पैसे नसतील तरीही काही हरकत नाही. तुम्ही पैसे का दिले नाही असंही तुम्हाला कुणी विचारणार नाही. तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढे आनंदाने हात जोडून इथे स्वीकारले जातात. ‘श्री सिद्धलिंग’ असं या हॉटेलचं नाव आहे.

शिवपाद किणगे हे 70 वर्षीय गृहस्थ हे हॉटेल चालवतात. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं ते हात जोडून नम्रतेने स्वागत करतात. शिवपाद किणगेंच्या सेवा भावी वृत्तीमुळे साऱ्या पंचक्रोशीत त्यांना किणगे महाराज म्हणून ओळखलं जातं. या हॉटेल परिसरातून जाताना पैसे नसतील किंवा कमी असतील तरी ‘भाऊसाहेब खाऊन जावा, पैसे नसू द्या’ असे शब्द किणगे महाराजांकडून ऐकायला मिळतात. कारण, प्रत्येकाला समाधानी ठेवलं, तर मला देव कमी करणारा नाही, अशी भावना किणगे महाराजांच्या मनात आहे.

शिवपाद दहा वर्षाचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आजीने त्यांना लहानाचे मोठे केले. सुरुवातीला काही दिवस त्यांनी दुधाचा व्यवसाय केला. पण, त्यात त्यांचं मन रमलं नाही. त्यानंतर त्यांनी गावातल्या येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना, शाळेतल्या मुलांना पाणी वाटपाचे काम सुरु केले. शाळेतल्या मुलांना आणि वाटसरुंना पाणी देण्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज हॉटेलपर्यंत येऊन पोहोचला. शिवपाद किणगे हे गेल्या 25 वर्षांपासून हे हॉटेल चालवत असून अशाच प्रकारे लोकांची सेवा करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button