हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार? 3 डिसेंबरला होणार निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे अधिवेशन रद्द होणार की पुढे ढकलणार याची चर्चा शिगेला पोहोचली आहे.
मुंबई, ता. 1- राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे अधिवेशन पुढे ढकलले जाणार की रद्द होणार अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे. येत्या 7 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार होते.
नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन यावेळेस कोरोना महामारीमुळे मुंबईतच घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. नोव्हेंबरच्या शेवटी समितीची पुन्हा बैठक घेऊन निर्णय निश्चित केला जाईल, असे सांगण्यात आले होते. पण, आता येत्या 3 डिसेंबरला बैठक होणार आहे.
अवश्य वाचाः पदवीधर निवडणुकीत राज्यात आमचेच उमदेवार निवडून येतील : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
अध्यक्ष नाना पटोले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 1 डिसेंबर 2019 रोजी पटोले यांनी विधानसभा अध्यज्ञ म्हणून बिनविरोध निवड झाली होती.