breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

हार्बर रेल्वे वाहतूक सेवा पर्ववत

मुंबई | महाईन्यूज

लोहमार्गावर मालगाडीचा डब्बा घसरल्यामुळे मंगळवारी रात्री हार्बर रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. ही घटना मध्य रेल्वेवर कुर्ला येथे घडली होती. त्यामुळे वाशी, बेलापूर व पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडली होती. बुधवारी सकाळी ही सेवा पूर्ववत करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास मालगाडीचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सीएसटी ते पनवेल, बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक रात्री उशीरपर्यंत ठप्प होती. परिणामी, वाशी, बेलापूर आणि पनवेलला कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button