‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’, अमोल मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
![‘This will overthrow the power of Baliraja’, Amol Mitkari attacks Modi government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/amol-mit.jpg)
मुंबई – केंद्र सरकारची हिटलरशी सुरू असून, हाच बळीराज यांची सत्ता उलथवून लावेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. यावेळी काहीठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट पाहण्यास मिळाली. पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुरा मारा देखील करण्यात आला. यावरून मिटकरींनी केंद्रावर हल्ला चढवला आहे.विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसे आहे. केंद्र सरकारने हिटलरशाही चालवली आहे. शेतकरीच केंद्र सरकारला जागा दाखवून देतील, अशी टीका अमोल मिटकरी यांनी मोदी सरकारवर केली आहे.
वाचा :–राष्ट्रवादीच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला गुरुवारपासून सुरुवात
एमएसपी लागू करावी व त्याबाबत अधिकृत लेखी द्यावे, एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार जर लाठीहल्ला करत असेल, तर ही इंग्रजांच्या काळाची पुनरावृत्ती आहे, हिटलरशाही आहे. येणाऱ्या काळात हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल, असा इशाराच अमोल मिटकरींनी दिला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. त्या पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, असे आवाहन केले आहे.