breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘स्वप्नातलं सत्यात फक्त पवार कुटुंबच उतरवू शकतं, अजून…’ रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

पुणे – शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टिका टिपण्णी केल्याचा वाचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे. “स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. चंद्रकांत दादा, अजून काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना तुम्हाला पाहायची आहेत” अशा शब्दात चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना टोमना हाणला आहे.

“चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, असे मत व्यक्त केले. पाटील यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी रुपाली चाकण म्हणाल्या की, चंद्रकांत दादांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाहीतर कशाला 105 आमदार घेऊन घरी बसावं लागलं असतं. त्यामुळे एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी, अशक्य ते शक्य करुन दाखवले त्याला एक वर्ष झालं. अजून काही स्वप्नं आहेत ते साकार होताना चंद्रकांत दादा तुम्हाला पाहायची आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो, आपणच सत्तेत येण्याची दिवा स्वप्नं पाहायची सोडून विरोधात आहोत, हे सत्य स्वीकारावं” असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला.

चंद्रकांत पाटीलांनी चोळले जखमेवर मीठ ?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्या स्वप्नात आहेत का ?” असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो किंवा इतर विषय, हे सरकार कशाबद्दलच खात्री देत नाही” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांपेक्षा सुप्रिया सुळे यांना प्राधान्य देतील, असेही याआधी चंद्रकांतदादा म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button