breaking-newsपुणेमहाराष्ट्र

स्मार्ट सिटी घेणार हॅकेथॉन स्पर्धा

पुणे – पुणे स्मार्ट सिटी आणि केंद्र सरकारचा नीति आयोग यांच्या विद्यमाने “हॅकेथॉन स्पर्धा’ घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा ऑगस्टच्या अखेरीस घेतली जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी देशातील ही पहिलीच स्पर्धा असून यामुळे नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.

नीति आयोगाचे उद्योग सल्लागार आणि त्यांची समिती आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी मनोजीत बोस यांच्यात नुकतीच एक बैठक झाली. यात नागरिककेंद्रीत समस्या सोडवण्यासाठी पहिली “स्मार्ट सिटी हॅकेथॉन’ ही 48 तासांची स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शहरी वाहतूक-गमनशीलता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची सुरक्षेचा समावेश असेल.

या स्पर्धेमुळे विकसक समुदाय, स्टार्ट अप्स आणि इतर संस्थांना या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या नागरिक केंद्रीय समस्या सोडवण्याच्या उद्देशाने अभिनव संकल्पना आणि उपाययोजना शोधण्यासाठी एक संधी मिळणार आहे. यात नागरिकांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. या समस्या केंद्र सरकारच्या माय गव्हर्नमेण्ट पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. नीति आयोगाबरोबर भागीदारी करून पुण्यामध्ये या “हॅकेथॉन’ चे आयोजन करणे ही पुणे स्मार्ट सिटी साठी एक मोठी संधी आहे, असल्याचे मत डॉ. जगताप यांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button