breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोन्याचा भावात आली घट तर,चांदी झाली महाग…

रुपयाच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे सोने आणि चांदीचे दर घटले आहेत. रुपयात आलेल्या मजबुतीमुळे राजधानी दिल्लीत सोन्याचा भावात १६२ रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ४१ हजार २९४ झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्याचा भाव ४१ हजार ४५६ होता.

दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. चांदीचा दर ६५७ रुपयांनी वाढून प्रति किलो ४७ हजार ८७० रुपयांवर पोहचला आहे. गेल्या कारोबारी सत्रात ४८ हजार ५२७ रुपयांवर चांदी बंद झाली होती.

मंगळवारी व्यापारी सत्राच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया ६ पैशांनी बचत होऊन ७१.३७ रुपयांवर पोहोचला. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी या दोन्हींच्या किमतीत घसरण झाली आहे. सोन्याचा दर १५७९ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १८ डॉलर प्रति औंस इतका झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तपन पटेल यांनी सांगितले की, चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक गुंतवणूकदारांवर दिसून येत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button