breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुशीलकुमार शिंदेंनी कॉंग्रेसबाबत बोलावं, राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र – शरद पवार

पुणे | महाईन्यूज

राष्ट्रवादी कॉंग्रेसची आणि पक्षाच्या निर्णयाची मला सर्वाधिक माहिती आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेसच्या बाबतीत बोलावं. राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र आहे. त्याबाबत आम्ही काय ते जाणतो, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केलेल्या पक्ष विलीनीकरणाच्या मुद्याला पूर्णविराम दिला आहे.

शरद पवार म्हणाले की, ” सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातील निर्णय याबाबत मला सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल भाष्य करु नये, तर काँग्रेसबाबत बोलावं”

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील”, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते.

सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विलीन होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या सगळ्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. याआधी अजित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना सुशीलकुमार शिंदे थकले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थकलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button