जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल
![Fighting between two groups over space dispute; Filing crimes against each other](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/crime-1.jpg)
पिंपरी चिंचवड | सिद्धार्थनगर, मामुर्डी येथे जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. हाणामारीची ही घटना रविवारी (दि. 20) घडली.
प्रवीण नवनाथ शिंदे (वय 23, रा. सिद्धार्थ नगर, मामुर्डी देहूरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुलाब बबन म्हसुडगे, भूषण म्हसुडगे, बाळू म्हसुडगे, सुनील म्हसुडगे, संदीप भंडलकर आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये जागेचा वाद आहे. त्यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले.
याच्या परस्पर विरोधात गुलाब बबन म्हसुडगे (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण नवनाथ शिंदे, रमेश नवनाथ शिंदे, स्वनील रमेश गायकवाड, एक महिला तसेच इतर पाच ते सहा अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून वाद आहे. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. आरोपी प्रवीण शिंदे याने फिर्यादी यांचा मुलगा भूषण याला लोखंडी रॉडने मारून जखमी केले.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.