Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सायकल वारीतील 8 वर्षीय चिमुरड्याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/nashk-cycle-wari-696x335.jpg)
सिन्नर – नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासनजीक शुक्रवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सायकल वारीत सहभागी नाशिकमधील 8 वर्षीय मुलगा ठार झाला आहे. प्रेम सचिन निफाडे असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. नाशिक ते पंढरपुर अशी या सायकल वारीत तो सहभागी झाला होता.
आज पहाटे सहा वाजता या सायकल वारीतील ग्रुप नाशिकहून निघाला. दरम्यान पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत प्रेम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ज्या ट्रकने त्याला धडक दिली तो चालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.