breaking-newsपुणेमहाराष्ट्र

साताऱ्यातील तरुणाईमध्ये नवीन राजांचा ‘उदय’

साताऱ्यातील राजकारण ज्यांच्या अवतीभोवती फिरते असे छत्रपतींचे तेरावे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे या ना त्या कारणारे कायमच चर्चेत असतात. अर्थात यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या प्रत्येक हलचालीकडे साताऱ्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिलेले असते. मात्र काल दसऱ्यानिमित्त उदयनराजेंबरोबरच सातारकरांमध्ये चर्चेचा विषय ठरले ते उदयनराजेंचे ज्येष्ठ पुत्र वीरप्रतापसिंह राजे भोसले.

दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर उदयनराजे राजे भोसले यांच्या निवासस्थानी म्हणजेच जलमंदिरात पुजेचे आयोजन केले जाते. यावेळी सामान्यांना वर्षातून एकदाच या वाड्यातील देवीचे तसेच उदयनराजेंचं दर्शन घेण्याची संधी मिळते. काल याच प्रसंगी वीरप्रतापसिंह राजेंबद्दल तरुणाईत असणारी क्रेझ पहायला मिळाली.

काल दसऱ्यानिमित्त उदयनराजेंबरोबरच सातारकरांमध्ये चर्चेचा विषय ठरले ते उदयनराजेंचे वरिष्ठ पुत्र वीरप्रतापसिंह राजे भोसले.

वीरप्रतापसिंह राजे हे शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज आहेत. ते आपल्या वडिलांबरोबर काल पार पडलेल्या पूजेला बसले होते. त्यानंतर ते उदयनराजेंबरोबर पालखी सोहळ्यातही सहभागी झाले.

यावेळी वीरप्रतापसिंह राजेंसोबत एक फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. विशेष म्हणजे या गर्दीमध्ये तरुणाईची संख्या मोठी होती. अनेकजण गर्दीतून वाट काढत वीरप्रतापसिंह राजेंबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना दिसले.

संपूर्ण सोहळा संपल्यानंतर वीरप्रतापसिंह उदयनराजेंच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसल्यानंतरही ही फोटो सेशन सुरुच होते. अगदी वीरप्रतापसिंह निघायला लागले तरी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठीची गर्दी काही हटता हटेना.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button