सांगलीत महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या
सांगली – वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेल मध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षता कोष्टी असे या युवतीचे नाव असून ती बीई सिव्हिलचे शिक्षण घेत होती.मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
महाविद्यालयाच्या आवारातील हॉस्टेलमध्ये आज सकाळी अक्षता हिने आपल्या रूममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अक्षता ही मूळची जत तालुक्यातील डफळापुरची रहिवासी आहे. सध्या वालचंद कॉलेजमध्ये सिव्हिल प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये पाच मैत्रिणीच्या सोबत राहत होती. आज सकाळी इतर मैत्रीणी कॉलेजला गेल्या.यानंतर काही मैत्रिणी पुन्हा रूमवर परतल्या. त्यावेळी अक्षता ही पंख्याला लटकत असल्याचे आढळून आले. यानंतर हॉस्टेलमध्ये खळबळ उडाली. याबाबत कॉलेज प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.