breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगलीत बनावट नोटा बनविणा-या कारखान्यावर छापा; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

सांगली – सांगली येथील शामरावनगरमधील एका बंगल्यात सुरु असणा-या बनावट नोटा छापण्याच्या कारखान्यावर कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक छापा टाकला. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांना स्कॅनरसह अन्य काही साहित्य आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, यातून बनावट नोटा छापणा-या मोठ्या रॅकेटचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीमध्ये एका अलिशान बंगल्यात हा कारखाना सुरु होता. रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली. सुमारे पंधरा पोलिसांच्या पथकाने धाड टाकत कारखान्याची तपासणी केली. यामध्ये स्कॅनरसह बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. याशिवाय काही बनावट नोटाही पोलिसांच्या हाताला लागल्या आहेत. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. दोनशे, पाचशे तसेच दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा या ठिकाणी छापल्या जात असल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. या छाप्याबाबत पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती. याशिवाय याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

कोल्हापूर पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात बनावट नोटासह साहित्य आढळून आले आहे. या ठिकाणी बनावट नोटांची छपाई करुन त्या सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात एजंटामार्फत खपविल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे. त्यामुळे बनावट नोटा खपविणा-या मोठ्या रॅकेटचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button