breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

सभा नरेंद्र मोदींची, चर्चा रिकाम्या खुर्च्यांची!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा सोमवारी वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेत मागच्या रांगेतील खुर्च्या रिकाम्या होत्या. यावरून राष्ट्रवादीने भाजप, मोदींवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ‘मोदी एकीकडे बोलत असताना दुसरीकडे रिकाम्या खुर्च्या, हीच भाजपाची यंदाची निवडणूकीतील परिस्थिती दर्शवते’ असे ट्विट मलिक यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान तथा भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली जाहिर सभा वर्धा येथे पार पडली.

या सभेला झालेली गर्दी केवळ पहिल्या रांगांमध्ये दिसत होती तर मागच्या भागामध्ये ठेवण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. एकीकडे मोदी भाषणाद्वारे उपस्थितांशी संवाद साधत असताना, दूसरीकडे मैदानातील खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मोदींच्या उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये झालेल्या सभेतही हेच चित्र दिसले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button