Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/jitendra-aawhad-Frame-copy.jpg)
नागपूर | महाईन्यूज
नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार राडेबाजी पाहायला मिळाली आहे. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनतर याप्रकरणी आता राजकीय प्रतिकियाही समोर येत आहे.
भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आलेला आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. सत्ता नसल्यानं भाजप आमदारांची तडफड होताना दिसत आहे. सभागृहात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली असल्याचंही, जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे. ते नागपूरमधील सभागृहाच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते.