breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल’

कर्णीसेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांचे विधान

सांगली –  संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदूधर्म वाचेल असे विधान कर्णीसेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी केले आहे. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज विजयादशमी दिवशी सांगता झाली.

या समारोप दौडीत हजारो धारकरी धावले. यावेळी बोलताना कर्णी सेनेचे सिंगर म्हणाले, सद्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत, संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्म गुरू आहेत. संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदूधर्म वाचेल असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. दौडीच्या सांगता समारंभास खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, कर्णीसेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी उपस्थिती लावली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button