संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा रद्द
औरंगाबाद – कोरोनामुळे संत एकनाथ महाराजांचा पैठण येथील नाथषष्ठी सोहळा रद्द करण्यात ला आहे. नाथषष्ठी हा वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा मानला जातो. जवळपास आठ ते दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असतो. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभीवर खबरदारी म्हणून हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
नाथषष्ठी सोहळा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. संत एकनाथ महाराजांच्या स्मृती निमित्त हा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आठ ते दहा लाख भाविक येतात. हा सोहळा जवळपास पंधरा दिवस चालतो. या सोहळ्याला खूप मोठी गर्दी असते. मात्र, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून गर्दीच्या ठिकानी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.