शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बॅंक मॅनेजर निलंबित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/crime_2017071599.jpg)
बुलडाणा – सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. ही कारावई अकोल विभागीय कार्यालयानेही केली. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली.
पीककर्जासाठी बॅंक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली.
या बॅंक मॅनेजरने या पूर्वी ही असा प्रकार केलाय का, याची आम्ही माहिती घेत आहोत. जनतेला आवाहन आहे की त्यांच्याकडे काही तक्रार असल्यास आम्हाला कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी केले आहे.