breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरीच ठरवतील देशाचा आगामी पंतप्रधान’ – खासदार राजू शेट्टी

नवी दिल्ली – शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या संतापातून देशभरातून हजारो शेतकऱ्यांचा आज संसदेवर धडक मोर्चा निघणार आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. यावेळी शेतकरी मोर्चाला संबोधित करताना खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत लाल किल्यावरुन भाषण करणारे पंतप्रधान कोण असतील, ते देशातील शेतकरीच ठरवतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणारा व्यक्तीच देशावर राज्य करणार आहे. त्यामुळे शेतकरी ज्यांना पाठिंबा देतील, त्याचीच सत्ता येईल आणि जे कोणी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करील, त्याचे नुकसानच होईल, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. जीएसटीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. हे अधिवेशन मध्यरात्री पार पडले. यासाठी दोन्ही सभागृह एकत्र येतात आणि जीएसटीला मंजुरी मिळते. मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही, असा सवालही राजू  शेट्टींचा सरकारला केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी होत आहेत. हा मोर्चा आज संसदेवर धडकणार असून या पार्श्वभूमीवर संसदेच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे.

शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱ्यांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1068385176533766144

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button