शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी कोठून आणणार? – राजू शेट्टींचा सवाल
![Raju Shetty's serious allegation of trying to break the farmers' movement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/raju-shetty-new-1.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|
शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये आणणार कोठून? शेवटी आयातच करावं लागेल , अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.
भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीसाठी येत्या 8 जानेवारीला देशभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून बंद दरम्यान म्हणजेच 8 तारखेला शेतकऱ्यांची काय ताकत आहे, हे सरकारला समजेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.
शिवथाळीबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिलं बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळी आणणार कोठून? शेवटी आयातच करावं लागेल , अशा शब्दात राजू शेट्टी यांनी टीका केली. दरम्यान 8 जानेवारीला बंद नियोजना बाबत आज कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी ही टीका केली.