breaking-newsमहाराष्ट्र

शिवसेनेचे उपसभापतिपद हुकले

  • भाजपची खेळी की राष्ट्रवादीचा विरोध?

विधानसभेच्या उपाध्यक्षपदासह विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. शिवसेनेला उपसभापतिपद देण्याची भाजपने तयारीही दर्शविली होती, पण  शेवटच्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रमच पुकारला गेला नाही. राष्ट्रवादीचा विरोध की भाजपची खेळी यामुळे शिवसेनेचे उपसभापतिपद हुकल्याचीच चर्चा होती.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचेच विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली. विधान परिषदेत सत्ताधारी अणि विरोधकांमध्ये फार अंतर नाही. उपसभापतिपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असा शिवसेनेचा आग्रह होता. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेत्यांनी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी चर्चाही केली. उपसभापतिपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर परस्परांशी संपर्कही साधण्यात आला होता. पण उपसभापतिपदाची निवडणूक झालीच नाही. सभापतींनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही, असे शिवसेनेचे अनिल परब यांचे म्हणणे आहे. विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरी विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेला लगेचच देण्याबाबत भाजपचे नेते आग्रही नव्हते. यातूनच निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button