शिवमुद्रा कैलव स्पोर्टसचा प्रथम क्रमांक; सागांवमध्ये कबड्डी स्पर्धा उत्साहात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Kabaddi.jpg)
सागांव । प्रतिनिधी – यशवंत युवक संघटनेच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित कुंभार सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अमित कुंभार उपस्थित होते. कबड्डी, खो-खो, कुस्ती स्पर्धेसाठी तरुण खेळाडुंना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. स्पर्धेसाठी एकूण १० संघांनी नोंदणी केली होती. उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा पार पडल्या. प्रथम क्रमांक शिवमुद्रा कैलव स्पोर्टस, द्वितीय अहिल्यादेवी स्पोर्टस कासेगाव, तृतीय खंडोबा व्यायाम मंडळ सागांव, चतुर्थ क्रमांक कासेगाव अ-स्पोर्टस यांनी पटकावला. स्पर्धेसाठी यशवंत दूधचे संचालक उद्धव पाटील, अजित शिंदे, प्रकाश कदम, रोहित असवले, संभाजीराजे असवले, अक्षय पाटील, सिद्धेश पाटील, अशोक सोनवडेकर, मानसिंग चिखलकर यांचे सहकार्य लाभले.