breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थानने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या ‘कळसुबाई’ शिखरावर साजरा केला प्रजासत्ताक दिन

पिंपरी |

शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान व जिजाऊंच स्वराज्य संघटना सह्याद्री मधील गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रत्येक महिन्यातून आयोजित करीत असते. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधुन शिवधर्म फाउंडेशनने महाराष्ट्रातील सर्वात उंच १६०० मीटर असलेल्या शिखरावर दि.२६ जानेवारीला जाऊन भारतीय राष्ट्रध्वजाचे पहाटे पहिल्या सूर्याच्या किरणासोबत ध्वजारोहण केले आहे. शिवधर्म फाउंडेशनने दि.२५ तारखेला किल्ले रतनगडला भेट दिली आहे. आणि गडाची पाहणी सोबत गडाची स्वच्छता केली आहे. २६ तारखेला पहिल्या सूर्याच्या किरणासोबत कळसुबाई शिखरावर शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान मार्फत भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले.

शिवधर्म फाउंडेशन मार्फत प्रश्नमंजुषा, शिवदिन विशेष प्रत्येक दिवशी प्रसार केला जातो. महाराष्ट्रातील गडकिल्लेबद्दल ऐतिहासिक गडाची माहिती देत संवर्धन मोहिमा तसेच सह्याद्रीमधील गडकिल्ले पाहण्याची इच्छा असलेल्या गिर्यारोहकांसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या ‘सह्याद्रीचे भुते’ मार्फ़त ट्रेकिंग मोहिमचे आयोजन प्रत्येक महिन्यात करण्यात येईल असा संकल्प करण्यात आला आहे.  या प्रसंगी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्रचे शिवकार्य आणि गडसंवर्धन समितीचे अध्यक्ष श्री.राज दादा तपसे, जिजाऊ स्वराज्य संघटनेच्या उपाध्यक्षा कु.पुर्वाताई काळे, मोहीम क्र.४ प्रमुख श्री.दिनेशदादा ढगे, व सुरज करांडे, अंकुश शिवतारे, वैभव टकले, जयश्री मुळे, माधुरीताई, स्वप्नील कापरे, निखिल घुले, विजय जाधव, निलेश भोम्बा, लक्ष्मण कोलते इत्यादी सभासद मोहिमेला उपस्थित होते.

‘महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आपण आज संवर्धन केले तर उद्या आपणच आपली दुर्ग रत्नाची नुतन श्रुष्टी गमावून बसू.. म्हणूनच गडकिल्ले संवर्धन करणे व त्याचे पावित्र्य जोपासणे आज काळाची गरज आहे. कळसुबाई शिखरावर पहिल्या सूर्यकिरणांच्या सोबत केलेला ध्वजारोहण कार्यक्रम मोठा उत्साह आणणारा होता.’

राज दादा तपसे

(अध्यक्ष – शिवकार्य गडकोट संवर्धन समिती, शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button