शासन संकेतस्थळावरील मुख्यमंत्र्याचा जाहिराती बंद करा, काॅंग्रेसची मागणी
निवडणूक आयोगाकडे सचिन सावंत यांची मागणी
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना अद्यापही शासकीय संकेतस्थळांवरती मुख्यमंत्री आणि शासनाच्या जाहिराती दिसत आहेत. https://cmo.maharashtra.gov.in/ , https://maharashtra.mygov.in या शासकीय संकेतस्थळावर अद्याप मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती झळकत आहेत. हा सरळसरळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. या जाहिराती तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत आणि
मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे. शासकीय संकेतस्थळांवरील मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा अशी मागणी सचिन सावंत यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे पत्राद्वारे केली आहे.