breaking-newsमहाराष्ट्र
शाळेच्या आवारात मानवी शरीराचे अवशेष सापडले
- स्वारगेट भागातील घटना
पुणे : शंकरशेठ रस्ता भागातील एका शाळेच्या आवारात मानवी शरीराचा अवशेष सापडल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शाळेच्या आवारात खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. शंकरशेठ रस्त्यावरील एका शाळेच्या आवारात दुपारी मुले खेळत होती. मैदानापासून काही अंतरावर झाडाजवळ मानवी शरीराचा अवशेष विद्यार्थ्यांना आढळून आला. घाबरलेल्या मुलांनी त्वरित या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षकांनी या घटनेची माहिती स्वारगेट पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. मानवी शरीराचा अवशेष पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.