breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात घबराट

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

शालिमार येथून लोकमान्य टिळक टर्मिनसला (एलटीटी) येणारी शालिमार एक्स्प्रेस बुधवारी सकाळी एलटीटी स्थानकात पोहोचली. यानंतर एक्स्प्रेस साफसफाईसाठी यार्डात नेण्यात आली. डब्यांमधील साफसफाईचे काम सुरु असताना कर्मचाऱ्यांना एका बॅगेत जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्या. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घेत जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. दुसरीकडे बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनसचा परिसर रिकामा केला असून टर्मिनसमध्ये कसून तपासणी केली जात आहे.

एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या कांड्या कशा पोहोचल्या, याचा पोलीस तपास करत असून या गोंधळामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधील वाहतूक काही काळ खोळंबली होती. एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्याने रेल्वेमधील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button