शरद पवार – नरेंद्र मोदींची भेट, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/modi4.png)
नवी दिल्ली |
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अजूनही सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेचे मंथन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या समस्या मांडण्यासाठी मोदींची भेट घेतले असे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या राजकीय विषयावर चर्चा झाली असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.
राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत देण्यात यावी. अशी मागणी शरद पवारांनी केली असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याटचे नाकारता येणार नाही.
देशातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बोलावण्यात आले होते. पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की, त्यांनी पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढच्या 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या वसंतदादा सुगर इंस्टीट्यूटच्या कार्यक्रमाचेही आमंत्रण दिले आहे.
मोदींना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीच्या एक दिवस पहिले शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी लेटर लिहिले होते. पत्राविषयी पवार म्हणाले की, दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानाची माहिती गोळा केली आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यात तुफान पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची आकडेवारी गोळा करणे सुरु आहे. याची माहिती लवकरच पाठवण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.