breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शरद पवारांवर टीका करणं हा चंद्रकांत पाटील यांचा बालिशपणा-धनंजय मुंडे

पिंपरी:- शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिशपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करत असल्याची टीका सोमवारी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांच्यावर टीका केल्याने माणूस मोठा होत नाही असा राजकीय इतिहास महाराष्ट्रात असल्याचे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभेनंतर भाजपा आणि शिवसेना हे फोडा फोडीचे राजकारण करत आहेत. भाजपा आणि सेनेला सत्तेची मस्ती चढली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आमच्या पक्षाच्या कोणत्या व्यक्ती आहेत ते त्यांनाच माहित आहे. मात्र आमच्याही संपर्कात भाजपाचे काहीजण आहेत असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.   यांचे अनेक ठिकाणी मतदारसंघ नाहीत ही दुर्दैवी बाब त्यांनी आधी मान्य करावी मग सांगा तुमच्या संपर्कात कोण आहे.  २२० जागा जिंकायच्या आहेत असं म्हणताय परंतु  पाच वर्षे राज्यात आणि देशात सत्तेत राहून महाराष्ट्रात स्वतः ची ताकद निर्माण करू शकला नाहीत अशीही टीका धनंजय मुंडे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button