Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
व्हॅलेंटाईन डे : प्रेमाच्या त्रिकोणातून पोलीस शिपायाने जीवन संपवले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/4-12.jpg)
जालना । महाईन्यूज । प्रतिनिधी
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच प्रेमाच्या त्रिकोणातून पोलीस शिपायाची आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विष्णू गाडेकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
प्रेमाच्या त्रिकोणातून पोलीस प्रियकर आणि प्रेयसीच्या छळाला आणि ब्लॅक मेलिंगला कंटाळून पोलीस शिपाई विष्णू गाडेकर यांनी आत्महत्या केलीय. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे ही घटना घडली. त्यामुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे.