breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विषाणू आढळलेल्या पोलिओ लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही – आरोग्यमंत्री

मुंबई- ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात टाईप टू‘ विषाणू आढळला आहे त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाहीअसे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहेअशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यानउद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणालेभारतामध्ये जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार पोलिओच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करत असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 45 ठिकाणांहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. देशातील पाच मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये ते तपासण्यात आले असून सांडपाण्यासोबतच विष्ठा नमुने देखील नियमितपणे तपासण्यात येतात. दरवर्षी साधारणतः 75 हजार विष्ठा नमुने तपासण्यात येतात.

पोलिओ लसीकरणांतर्गत करण्यात आलेल्या लसीकरणामुळे बालकांना कुठल्याही प्रकारच्या जोखीमीचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत असून ज्या कंपनीच्या पोलिओ लसीच्या उत्पादनात हा विषाणू आढळून आला त्याचा वापर केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात थांबविण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button