Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
विरोधी पक्षाला महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/4-17.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सरकार बरोबर बोलायचे नाही, त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत, आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तयार आहोत, मात्र त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.