Breaking-newsमहाराष्ट्र
विधानपरिषद निकाल : नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/narendra-darade1-.jpg)
नाशिक : विधान परिषदेतील नाशिक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले आहेत. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांच्यात लढत होती.
या निवडणुकीसाठी ६४४ मतदार होते. पक्षीय बलाबलाचा विचार करता शिवसेनेचे २०७, काँग्रेस आघाडी १७१, भाजपा (मित्रपक्ष) १७८, माकप १३, आणि इतर छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून ७५ मतदार होते. आज गुरुवारी झालेल्या मतमोजणीत नरेंद्र दराडे यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत दराडे यांना ४०० मते मिळाली. तर सहाणे यांना २३१ मतेच मिळाली आहेत.