विधानपरिषदेच्या चार जागांसाठी उद्या मतदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/election-neta.jpg)
मुंबई – विधान परिषदेच्या मुंबई व कोकण शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या चार मतदारसंघात तब्बल 52 उमेदवार रिंगणात असून प्रथमच शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 12 उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपाचे अमितकुमार मेहता व शेकापचे राजेंद्र कोरडे यांच्यात चुरशीची लढत आहेत. कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात 14 उमेदवार असून राष्ट्रवादीतून भाजपात आलेले निरंजन डावखरे, शिवसेनेचे उमेदवार ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे व राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांच्यात लढत होणार आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात 10 उमेदवार निवडणूक रिंगणात असून विद्यमान आमदार लोकभारतीचे कपिल पाटील, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख हे प्रमुख उमेदवार आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे, भाजपचे अनिकेत विजय पाटील, माजी खासदार प्रताप सोनावणे आणि संदीप बेडसे यांच्यात लढत आहे.
विधानपरिषद लढतीचे चित्र…
मतदारसंघ उमेदवारांची संख्या मतदारांची संख्या
मुंबई पदवीधर 12 70 हजार 636
कोकण पदवीधर 14 1 लाख 4 हजार 264
मुंबई शिक्षक 10 10 हजार 141
नाशिक शिक्षक 16 53 हजार 892