विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/abdul-sattar1.jpg)
धुळे – पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (२६ ऑगस्ट) रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज देखील केला. विविध मागण्यांसाठी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घ्यायची होती, पण त्यांची भेट घेऊ दिली जात नसल्यामुळे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट अब्दुल सत्तार यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच रास्ता रोको केला.
विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असा आरोप विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क ३० टक्के माफ करावे, अशी मागणी यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी तात्काळ या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. १२ ते १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.