विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या शिपायास अटक
![Uttar Pradesh police go to Chennai and arrest one for criticizing PM Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/arrest-1_20170912029.jpg)
पुण्यातील कोथरुडमधील एका इंग्लिश मिडियम शाळेतील तीन विद्यार्थिनींना अश्लि व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. संभाजी रघुनाथ चौधरी (वय 47 रा. शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या या शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील पी बी जोग शाळेत 3 फेबुवारी ते 5 ऑक्टोबर या आठ महिन्याच्या कालावधीत तेथील शिपाई संभाजी चौधरी याने शाळेतील तीन विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखवल्याचा आरोप आहे. तर यानंतर त्याने वेळोवेळी शिवीगाळ करुन त्यांच्याशी अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नका अशी त्याने तिघींना धमकी दिली होती.
विद्यार्थिनींना मुख्याध्यापक आणि पालकांना घडलेला प्रकार सांगितला. विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार संभाजी चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली जात असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.