breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो
उस्मानाबाद |महाईन्यूज|
विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ? असा सवाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन केला. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.
मोठ्या उत्साहात सकाळी ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. या संमेलनाला वादाचाही पार्श्वभूमी होती. या संमेलनाला जाऊ नका, असं आवाहन ब्राह्मण महासंघानं उदघाटक ना. धो. महानौरांना केलं होतं. साहित्यिकाला जात नसते, असं महानोरांनी संमेलनाच्या मंचावरुनच ठणकावलं.