breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय; रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिस आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.तसंच मुख्यमंत्र्यांनी समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसप्रसंगी शुभेच्छा देऊन होर्डिंग्ज लावू नयेत असं आवाहनहा केलं आहे.
मदत निधीसाठी देणगी द्यावी आणि रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करावे, असं त्यांनी त्यांच्या कार्यालयातून सांगितलं आहे. तसेच त्यांनी ट्विट करूनही हे सांगितलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला वाढदिवस आहे परंतु राज्यावरचं कोरोनाचं संकट पाहता आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याआधीसुद्धा अनेक नेत्यांनी कोरोना संकटामुळे वाढदिवस साजरा करणे टाळले आहे.