breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

लोणावळा खंडाळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला
होणार हिलस्टेशन : छगन भुजबळ

नाशिक |महाईन्यूज | प्रतिनिधी

लोणावळा खंडाळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावं यासाठी अभ्यास सुरू असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये घरकुल, रखडलेले जलसिंचन, वीजपुरवठा प्रलंबित प्रश्नांवर आढावा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल आढावा, पंतप्रधान घरकुल योजना, आदिवासी विकास योजनांचा बाबत आढावा यासह विविध प्रश्नाचा आढावा घेण्यात येणार आहे.

ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या काळात तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षात रखडलेले आहे. त्यात प्रामुख्याने कलाग्राम, बोटक्लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची आणि उपयोगी असलेली काही काम आणि अपूर्ण असलेले काम आहेत त्यावर निश्चितपणे विषय घेणार आहोत. तसेच विमान सेवेबाबत काही अडचणी आहेत त्यावर बोलणार आहे.

महाविकास आघाडी बाबत बोलतांना ते म्हणाले की, खा. शरद पवार , संजय राऊत, उद्धव ठाकरे अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी हे सरकार स्थापण केले आहे. त्यामुळे इतिहास काही गोष्टी आहे, मात्र त्या गोष्ठी बाजूला ठेऊन सरकारने काम करायला पाहिजे. त्यामुळे सगळयाची जबाबदारी आहे, सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही. त्यामुळे सतत काहीतरी बोलणं चांगलं लक्षण नाही. थोडंस याबाबत दुसरे काही पक्ष आहे असं म्हणून बोलायला पाहिजे. यासाठी आपणही सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button