breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नागरिकांच्या प्रश्नांसाठी अखिल भारतीय सेना मैदानात, विधानसभेच्या सर्व जागा लढविणार

  • सर्वसामान्यांसाठी “डॅडीं”नी संपूर्ण अयुष्य वेचले
  • आशा गवळींनी घेतली लातूर, उदगीरच्या कार्यकर्त्यांची भेट 

उदगीर, (प्रतिनिधी) – राज्यातील सर्वसामान्य नागरिकांवर होणारा आन्याय दूर करण्यासाठी अरुण गवळी यांनी आपले आयुष्य वेचले. सर्वसामान्यांसाठीची ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार आहे. लातुरसह उदगीरमधील लोकांच्या प्रश्नांसाठी अखिल भारतीय सेना सदैव कार्यतत्पर राहील, असे उदगार आखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रिय सरचिटनीस आशा अरुण गवळी यांनी येथे काढले.

अखिल भारती सेनेच्या उदगीर येथील जिल्हा शाखांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गवळी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उदगीर वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. विजय दिक्षीत होते. यावेळी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसह पक्षातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गवळी म्हणाल्या की, अखिल भारतीय सेना ही सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी मैदानात उतरली आहे. जात, धर्म यापेक्षा माणुस महत्वाचा असून जातीधर्माच्या पलिकडचे समाजकारण व राजकारण आम्ही करत आलो आहोत. सदैव लोककल्याण हाच ध्यास घेऊन राजकिय व्यवस्था जोपासण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करण्याचे काम आम्ही करत आलो अहोत. त्यामुळेच लोकांनी आम्हाला जीवापाड प्रेम कले. त्यांचे प्रेम व जिव्हाळा हीच आमची शक्ती असून प्रत्येकाच्या हितासाठी आमचा कार्यकर्ता उभा टाकला आहे. आम्ही जे कांही साध्य केले आहे, ते केवळ कार्यकर्त्याच्या बळावरच केले आहे. आता याच कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही पुढील सामाजिक, राजकीय दिशा ठरवत आहोत.

प्रत्येकाच्या घरापर्यंत आम्ही काम करत आहोत लातूर जिल्ह्यात विश्वनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाडीचे काम सुरु आहे. आजचे संपर्क कार्यालय म्हणजे दगडी चाळीचे संपर्क कार्यालय बनले आहे. प्रत्येक कार्यकर्ता नीर्भिडपणे उभा टाकला पाहिजे. तरच, समाजाचे हित जोपासण्याठी आपण काम करु शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या बहुतांश जागा लडविण्यात येणार आहेत. पक्षाची ताकद घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असेही त्या म्हाणाल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष कासले व विजय दिक्षीत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आर्जुन जाधव यांनी केले. तर, सुत्रसंचलन सुनिल हावा यांनी केले. आभार जिल्हा कार्याध्यक्ष अॕड.श्रावणकुमार माने यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button