breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लोकांचे जीव धोक्यात घालून चालवली जाते शिवशाही…

मुंबई: लोकांचे जीव धोक्यात घालून शिवशाही बस चालवली जात आहे. या शिवशाही बसचे केवळ ठाणे विभागात वर्षभरात तब्बल २७ अपघात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या शिवशाही बसचे ७, तर एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बसचे तब्बल २० अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण अपघातामध्ये १६ अपघात गंभीर स्वरूपाचे असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुख्य म्हणजे एवढे अपघात होऊन सुद्धा परिवहन विभाग आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना अजूनही जाग आलेली नाही. असे राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी म्हटले आहे. एसटीच्या ठाणे विभागातील एकूण शिवशाही बसची संख्या ४७ असून यामध्ये ३५ एसटीच्या मालकीच्या बस आहेत. तर, उर्वरित १२ कंत्राटी स्वरूपात चालवण्यात येतात. कंत्राटी शिवशाहीवर चालक कंत्राटदाराचे आणि वाहक एसटीचा असतो.

मागील काही दिवसात राज्यभरात विविध ठिकाणी शिवशाही बसच्या झालेल्या अपघातानंतरही खाजगी शिवशाहीवरील चालक योग्य प्रशिक्षित नाहीत. खासगी कंत्राटदाराच्या बसेसचे चालकांना कोणतेही प्रशिक्षण नसते. या सर्वांची जबाबदारी म्हणून परिवहन मंत्र्यांनी यावर कारवाई करायला हवी पण परिवहन विभागाचा कारभार उफराटाच सुरू आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये असा प्रश्न लोकांना पडला आहे अशी टीका हेमंत टकले यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button